सेवालाल जयंती निमित्त हिवरा येथे महानायक वसंतरावजी नायक चौकाचे अनावरण
प्रतिनिधी / एस.के. शब्बीर
महागाव तालुक्यातील हीवरा येथे क्रातीकारी सेवालात महाराज जयंती ही मोठ्या उत्साहास साजरी करण्यात आली .
जयंतीचे औचित्य साधून हरीत क्रातीचे प्रनेते महानायक वसंतराजी नाईक
यांचे तैलचित्राचे आनावरन सोहळा पार काल दी. 15 / 02 / 2022 मंगळवार रोजी मा.श्री.साहेबराव पाटील (माजी.जी.प सदस्य हिवरा) यांच्या हस्ते पार पडला. त्याठीकानी बंजारा समाजाच्या काही महिला व काही तरुण आपल्या पारंपारीक वेशभूषेत सहभाग झाल्या. त्यामध्ये अनंतनगर ,सेवानगर , तिवरंग , इजणी ,लेवा येथील नायक ,कारभारी,सरपंच , उपसरपंच व सर्व नवयुवक तरून वर्ग माता-भगीनी सर्व पत्रकार मित्र उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा.श्री.मेघराज जाधव सर यांनी स्विकारले. तर प्रमुख पाहुने म्हणून मा.साहेबराव पाटील (माजी.जी.प सदस्य हिवरा)दिगांबर पाचकोरे (खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष)संदीप ठाकरे (प.स.सदस्य करंजखेड) विलाश राव कव्हाने , प्रविन भाऊ जामकर, दिलीप राठोड , सुहास पवार , दिगांबर पाटील,विष्णु करमोडकर ,भगवानराव फाळके(अध्यक्ष पत्रकार संघ हिवरा)हे होते.
या कार्यक्रमाचे आयोजन महानायक वसंतरावजी नायक प्रतिष्ठान चे सदस्य आमचे नेते गुणवंतभाऊ राठोड , चयन राठोड , विशाल नुळसावत ,आजेश जाधव (गोर सेना तालुका अध्यक्ष), प्रविन जामकर , अमोल ठाकरे , ज्ञानेश्वर पवार , सागर जाधव हे होते.