हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारूलुम मोहम्मदिया रोडवरील दानपेटी फोडून चोरट्यांनी केली लंपास.
ब्युरो रिपोर्ट | एस.के. चांद हिमायतनगर
भोकर राष्ट्रीय महामार्गावरील हिमायतनगर शहराला लागून असलेल्या दारुल उलूम मोहम्मदियाची रोडवर असलेली दान पेटी काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून लंपास केली आहे.
हिमायतनगर तालुक्यात चोरटयांनी गेल्या तीन दिवसापासून लगातार चोरीच्या प्रकाराला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय पुन्हा काल मध्यरात्रीला घडला आहे. हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळ जाऊन पाहणी केली.त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात चोरट्याना पकडण्याचे मोठे आव्हान हिमायतनगर पोलिसांसमोर उभे आहे.
हिमायतनगर तालुक्याचे ठिकाण असून, येथील पोलीस ठाण्याचे अंतर्गत ४८ ग्रामपंचायती आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील अनेक महिन्यापासून चॊरीचे सत्र हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात सुरु आहे.
काही दिवस चोरीच्या घटना थांबल्या मात्र पुन्हा थंडीच्या कडाक्याचा फायदा घेत चोरट्यानी शहरासह ग्रामीण भागात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुन्हा आणखी हिमायतनगर शहरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.