राजकारण

शहीद हजरत टिपू सुलतान यांचेवर कुकर्म शासक म्हणून खोटे वक्तव्य करुण हजरतटिपू सुलतान यांचा अपमान केल्या प्रकरणी हिमायतनगर येथे जाहिर निषेध

शहीद हजरत टिपू सुलतान यांचेवर कुकर्म शासक म्हणून खोटे वक्तव्य करुण हजरतटिपू सुलतान यांचा अपमान केल्या प्रकरणी हिमायतनगर येथे जाहिर निषे

 

( हिमायतनगर प्रतिनिधी )

हजरत टिपू सुलतान त्या मोजक्या राज्यकर्त्यांमधून आहे जो इंग्रजांसमोर एक शूर योद्धा म्हणून उभा राहीला,निडरतेने इंग्रजांविरुद्ध लढला आणि लढता लढता शहीद झाला!

 

टिपू सुलतानला आज ,आरएसएसकडून आणि भाजपाकडून विरोध होण्याचं कारण इतकंच आहे की सगळ्यात अगोदर इंग्रज आपल्या भूमीसाठी वाईट आहेत,

त्याचं इथे राज्य निर्माण होणे हे आपल्या सगळ्यांसाठीच व आपल्या भूमीसाठी

अहितकारक आहे.सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्याविरुद्ध लढत पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीच वाढणं धोकादायक आहे आणि त्यासाठी टिपूने स्वतःहा पुढाकार घेऊन मराठ्यांना व निजामला पत्रव्यवहार करून हे सांगितल.टिपूने स्वतःहा इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले,इंग्रजांच्या नाकी नऊ आणले.भूमीसाठी अन्यायाविरुद्ध लढता लढता रणांगणात शहीद झाला मात्र माघार घेतली नाही,इंग्रजांसमोर झुकला नाही!

टिपू सुलतान म्हणजे एक आदर्श प्रजाहितवादी,प्रचंड दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता होता.

शेतकऱ्यांसाठी त्या काळी नवनवीन व शेतकरी हिताचे धोरण त्याने त्याच्या राज्यात राबवले.अस्पृश्यते विरुद्ध लढला,जातीधर्माच्या नावाने कधी भेद केला नाही.मंदिरांना देणग्या तो द्यायचा.गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना तो राबवायचा.

परंतु राज्याचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनी देशाचे पहिले स्वतंत्रय सेनानी शहीद हजरत टिपुसुलतान यांचे विषयी अपशब्द वापरून अपमान केले ,व् म्हणाले की ते कुकर्म शासक होते त्यांनी हिन्दूवरअत्याचार केले असे खोटे वक्तव्य करुन देशाचे पहिले स्वतंत्रय सेनानी हजरत टिपू सुलतान यांचे अपमान केले व् भारतातील सर्व मुस्लिम समाजाची भावना दुख्वाल्या प्रकरणी आज दिनांक 28/01/2022 रोजी हिमायतनगर येथे सर्व मुस्लिम समाजा तर्फे जाहिर निषेध करण्यात आले, व् हिमायतानगर चे तहसीलदार, पोलिस निरीक्षक हिमायतनगर यांना निवेदन देण्यात आले, व् कठोर कार्यवाहिची मागणी करण्यात आली,

यावेळी एस डी आमेर, सय्यद अब्दुल अजिम (अजिम हिंदुस्तानी)शाहरुख खान राउफ खान ,शोएब खान सरदार खान, शेख मजहर शेख चाँद, अर्शद अली शमशाद अली, रियाज खान वली खान, sk मतीन, मोहम्मद ईलाहीखुरेशी, मोहम्मद तोहिद खुरेशी,मोहम्मद वाजिद खुरेशी सय्यद सईद, उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *