क्राईम डायरी

हिमायतनगर शहरा साठी प्रभारी नको,कायम स्वरुपी पोलीस निरीक्षक हवा…!

हिमायतनगर शहरा साठी प्रभारी नको,कायम स्वरुपी पोलीस निरीक्षक हवा…!

शहरातील अवैध धंद्यांमुळे ! गुन्हेगारीचे प्रमाण वाढले.नवीन सिंघम पोलीस अधिकाऱ्याची गरज ?

 

हिमायतनगर प्रतिनिधी /- नागोराव शिंदे

 

शहरा सह तालुक्यातील गुटखा,मटका,जुगार अड्डे, दारू अशा अवैध धंदे वाल्यांनी डोके वर काढले आहे या सर्व अवैध धंदेवाल्यांना शहरातील स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे अभय असल्याचे जनतेतून बोलले जात आहे शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे,खुनाचे ,चोरीचे, व महिला मुलींना छेड छाडीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र मागील आठ महिन्यापासून पहायला मिळत आहे पण ह्यावर कायम स्वरुपी तोडगा काही निघत नाही ! मागील काही दिवसांपासून हिमायतनगर शहरात वारंवार चित्तथरारक अशा घटना सुद्धा घडत आहेत या सर्व बाबीकडे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे ,यांनी गांभीर्याने लक्ष देऊन हिमायतनगर शहरासाठी डेरिंगबाज डॅशिंग ” प्रभारी नको तर कायम स्वरुपी ” सिंघम पोलीस निरीक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी शहरातील सुजाण सुशिक्षित नागरिकातून होत आहे

 

हिमायतनगर पोलीस स्टेशन हद्दीत मागील चार महिन्यापासून जवळपास पाच-सहा खुनाच्या घटना व लाखो रुपयांची घर फोडी,चोऱ्या अशा घटना घडत आहेत या खुणाच्या घटनेमुळे तर हिमायतनगर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये खूप भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पण खून व गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही दिवसेंदिवस हिमायतनगर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने हिमायतनगर शहरास शिस्त लावणारा व कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारा एक कर्तव्यदक्ष सिंघम डेरिंगबाज पोलीस निरीक्षक हवा असल्याच्या भावना नागरिकांतून व्यक्त होत आहेत येथील पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक कांबळे साहेब यांनी खुप मोठ्या प्रमाानात येथील गुन्हेगारी ला आवर घातला आहे पण आता त्यांची तब्यत बिगडल्याने ते काही दिवस दिर्घ रजजे वर गेल्याने त्यांच्या जागी नवीन प्रभारी पोलीस निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे पण येथील अवैध धंदे करणारेच शहरात व तालुक्यात गुन्हेगारी वाढवत आहेत त्यामुळे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदजी शेवाळे यांनी हिमायतनगर शहरासाठी प्रभारी नको तर कायम स्वरुपी दबंग पोलीस निरीक्षक देऊन येथील गुन्हेगारीस व अवैध धांद्यास आळा घालण्यासाठी एक कर्तव्यदक्ष जसे की ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय “या म्हणीचे काटेकोर पालन करणारा एक सच्चा सिंघम अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी अशी मागणी हिमायतनगर शहरातील नागरिकांन मधून होत आहे

 

चौकट

 

प्रभारी पोलीस निरीक्षक शहरातील गुन्हेगारी कमी करतील का ? गावकऱ्यांच्या अपेक्षा !

 

हिमायतनगर तालुक्यात मागील अनेक दिवसापासून अवैध धंद्याचे व चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे ह्या सर्व बाबी ला प्रभारी महणुंन नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अंतत्रे साहेब हे आळा घालतील का ? हे पाहणे खुप ओसुक्त्याचे ठरणार आहे मागील काळात येथील सर्व अवैध धंदे बंद करणारे अनिल सिंह गौतम साहेबांन सारखा अधिकारी पुन्हा एकदा शहरासाठी लाभेल का ? अशा भावना सुद्धा गावकऱ्यान मधून व्यक्त होत आहेत

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *