जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या हस्ते महागाव येथील नवीन पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण
: महागाव
महागाव शहरातील निर्माणाधीन पोलीस वसाहत मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शनिवारी रात्री सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पंचवटी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.
आपल्या जिल्ह्यामध्ये प्रथमच लोहारा पोलीस स्टेशन मध्ये संपूर्ण महिलांच्या हाती प्रशासन दिले आहे ही गौरवाची बाब असल्याचे औचित्य साधून जगदीश नरवाडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्याची तातडीने उकल करून पोलीसा विषयी जनतेमध्ये विश्वास निर्माण केल्याबद्दल महागाव तालुका पत्रकार असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष संजय भगत यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी ठाणेदार विलास चव्हाण सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी आणि संजय कोपरकर, विनोद कोपरकर बेस्ट टेलर, मनोज सुरवसे ,अमोल राजवाडे ,विशाल पांडे, गणेश भोयर, सुभाष नरवाडे देवानंद जाधव इतर नागरिक उपस्थित होते.