क्राईम डायरी

दिवसा ढवळ्या पोलीस असल्याचे बतावणी करून सुवर्णकारस लुटले परिसरात खळबळ

 

प्रतिनिधी महागाव : एस. के. शब्बीर

पोलिस असल्याचा बनाव करत अज्ञात तोतयाने महागाव तालुक्यातील सुवर्णकाजवळील सोने पोबारा केल्याची घटना गुरुवार (ता. ३०) रोजी भरदिवसा नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी सुवर्णकार व्यापारी देविदास दारव्हेकर यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.सदर व्यापाऱ्याचे महागाव येथे बालाजी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. व्यापारी दारव्हेकर दर गुरुवारी लेवा व वेणी येथे व्यवसायासाठी जात असत.त्यांच्या दुकानातील माल संपलामुळे त्यांनी नांदेड येथून मंगळसूत्र व पेंडल असा ३१ग्राम ४३०मि.ली सोन्याचे दागिने किंमत अंदाजे १,४१,२७२ रुपयांचा माल त्यांनी आणून ठेवला होता तर नेहमी प्रमाणे ते खेड्यावर माल घेऊन व्यवसायासाठी लेवा खेड्याकरिता निघाले अंदाजे सकाळी ९.०० वाजता दरम्यान कलगाव ब्रिज जवळ पोहचले असता पाठीमागून दोन अज्ञात इसम मोटर सायकलने त्यांच्या जवळ गेले असता त्यांनी पोलीस असल्याचे बतावणी केली.तसेच तोतया पोलिसांनी गाडी थांबविण्यासाठी सांगून त्यांचे खिसे चेक करून, बॅग चेक केली व त्यामधील पुरुष्ठाच्या दागिन्यांची डब्बी उघडून पाहून हात चालाखीने सदर व्यापारी याना न कळताच डब्बी गायब केल्यानंतर व्यापाऱ्याला त्यांनी रवाना केले.लेवा येथे व्यवसायासाठी डब्बी बघितली असता त्यांच्या फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सदर पोलीस आहे असे बतावणी करणारे अज्ञात आरोपी मधील एक उंच पुरा व लांबट चेहऱ्याचा मिल्टरी कलरचा पॅन्ट घालून होता तर काळ्या रंगाचे जॅकेट घालून वय अंदाजे ४०वर्षाचा होता तसेच दुसरा आरोपी इसम ठेंगणा निम्मगोरा,पांढरा शर्ट, भुरक्या रंगाचा पॅन्ट वय अंदाजे ३२वर्षे असून त्यांनी एकूण सोन्याचे दागिने अंदाजे १,४१,२७२ रुपये किंमतीचे हातचालाखी करून पसार झाले.याप्रकरणी महागाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महागाव पोलीस करत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *