शिक्षकांनी केला आचार संहितेचा भंग
(ग्रामस्थांची शिस्तभंग कारवाईची मागणी)
महागाव:-
ग्राम पंचायत पोटनिवडणुकीत कर्तव्यावर आलेली शिक्षकाने व सुट्टीवर गावात आलेल्या शिक्षकाने गावातील मतदारांना प्रलोभन दाखवुन आदर्श आचार संहिता भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी ग्राम पंचायत ने केली आहे.
महागाव तालुक्यातील बोथा ग्राम पंचायतची निवडणुक होती या निवडणुकीसाठी मतदान कर्मचारी म्हणुन जि.प.शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ बरगे, जि.प.शाळा लोहरा(खु)चे मुख्याध्यापक सचिन खटके व शिनुर ता.अक्कलकोट जि.सोलापुर येथे जि.प.शाळेवर शिक्षक असलेले परमेश्वर आनंद इंगळे यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर येवुन मतदारांना प्रलोभन देवुन खुलेआम प्रचार केला असुन शासकीय कर्मचारी असतांना आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे.त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भिमराव खंडागळे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हापरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.