शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचे अनुदान एटीएम ने उचलावे शाखा अधिकारी वाडेकर
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यात जून महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी मुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर प्रति हेक्टरी 10 ते 15 हजार रुपये असे अनुदान नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा हिमायतनगर येथे जमा झाले असुण ते अनुदान शेतकऱ्यांनी तारखिनुसार गावाचे वाटप प्रोग्राम बँकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेले आहे आपल्या खात्यावरील अनुदान हे एटीएम द्वारे उचलून घ्यावे
जेणेकरून आपला वेळ आणि कामाची बचत होणार असल्याचे शाखा अधिकारी पी जी वाडेकर यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे यावेळी बँक इन्स्पेक्टर एस डी आक्लवाड व्हि पि शिंदे यु आय कांबळे कारकून यांच्यासह बँक स्टॉप उपस्थित होता यावेळी वाडेकर यांनी सांगितले की शाखे अंतर्गत खातेदारांना बँकेमार्फत एटि एम वाटप केल्याने शेतकरी खातेदार आपले अनुदान एटीएम ने अनुदान उचलत असल्याने बँकेच्या कामकाजावर हिमायतनगर तालुक्यामधून खाते दारातून समाधान व्यक्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे