महामार्गाच्या रस्त्यावर होत आहे बारूद ब्लास्टिंगमुळ वाहनधारकांचा जीव धोक्यात
जि. प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
( स्फोटक पदार्थाच्या वापराकडे पोलीस प्रशासनयांचे दुर्लक्ष महामार्गाच्या कामावर होत आहे भारत ब्लास्टिंग त्याच्या जिवाला धोका ब्लास्टिंग च्या कर्कश् आवाजामुळे जंगलातील वनप्राणी भयभईत. पोलीस प्रशासनाचे व शासनाचे दुर्लक्ष उमरखेड व महागाव तालुक्यातील महामार्गाच्या कामावर रस्त्यावरील खडक फोडण्यासाठी मशीनच्या सहाय्याने बारूद ब्लास्टिंग होत असल्याने प्रवासी वाहन धारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे परंतु पोलिस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहनधारक करीत आहे
नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 चे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याचे काम घेतलेल्या शेखावटी कन्ट्रक्शन कंपनीच्यावतीने नांदगाव गावच्या जवळ उमरखेड हद्दीत व महागाव हद्दीत या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावर असलेले खडक दगड फोडण्यासाठी मशिनच्या साह्याने दिवसा बारूद ब्लास्टिंग केल्या जात असल्याने या ब्लास्टिंगमुळे दगड व दगडाचे तुकडे भयानक जोरात उडत आहेत….
या दगडाच्या उडणार्या तुकड्या मुळे धुळीच्या लोटा मुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे दिवसाढवळ्या ब्लास्टिंग होत असताना मात्र पोलीस प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष केल्यास दिसून येत असल्याने भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहणार…… असा सवाल वाहनधारक उपस्थित करीत असून बारूद ब्लास्टिंग करून पर्यावरणाला व वाहन धारकांच्या व वन प्राण्याच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कंट्रक्शन कंपनी व फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे….. चौकट
स्फोटक पदार्थ वापरण्यास परवानगी कोणाची रस्त्याच्या कामावर मशीनच्या सहाय्याने ब्लास्टिंग केल्या जात आहे या ब्लास्टिंग साठी सारखे तत्सम पदार्थ वापरला जात असल्याचे दिसून येत आहे या या स्फोटक पदार्थाचा वापर करण्यास बंदी असताना या कंट्रक्शन कंपनीकडून घातक स्पोटक पदार्थ सर्रास वापरले जात असताना यावर कारवाई होत नसल्याने या ठिकाणी स्फोटक पदार्थ वापरण्यास गृह विभागाने मुखसंमती दिल्ली की काय असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे…. नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 कॉन्ट्रॅक्टदार येथील शेखावटी कंपनीचे किशोर चौधरी
म्हणतात की जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे आणि मीडिया मेरी मुठ्ठी मे