अब्दुल सोहेल खतीब यांनी मा महासंचालक व राज्यचे गृह मंत्री यांना दिले निवेद
प्रतिनिधी / /नांदेड
जिवितास धोका असलयामुळे अब्दुल सोहेल खतीब यांना जिवे मारण्याची धमकी येत आहे. या साठी संरक्षण मिळवण्यासाठी मा महासंचालक व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदन दिले.
————————
अर्धापूर दि.४ तालुका प्रतिनिधी
————
अर्धापूर :–
अर्धापूरात असलेल्या समाजसेवक व पत्रकार तथा अत्याचार निर्मूलन अभियान महाराष्ट्र नांदेड जिल्हा अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल यांनी दि ०१/१२/२०२१ रोजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मा.गृहमंत्री यांच्या कडे निवेदन दिले.माहिती अधिकार मार्फत अनेक कार्यालयात माहिती अधिकार टाकून कार्यालयात होणारे व बाहेर चालणाऱ्या कामामध्ये भ्रष्टाचार उघड करण्याचे काम करते.त्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकते असा निवेदनामध्ये उल्लेखनीय आहे. खतीब अब्दुल सोहेल सामाजिक कार्यकर्ता असून समाजाच्या भल्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांना हितासाठी कर्तव्यदक्ष आहे. यांनी दिलेल्या माहिती अधिकार मध्ये अनेक समाजकंटकाकडुन त्यांना जीवे मारण्याची धमकी येत आहे.जर यांची मागणी पूर्ण झाली नाही. तो मा न्यायालयात दाद मागावी लागेल असे अब्दुल सोहेल खतीब यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना बोलताना सांगितले.