हिमायतनगर येथील पंचायत समिती चा अधिकारी चतुर्भुज लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
हिमायतनगर
शहरातील पंचायत समिती विभागातील कनिष्ठ लिपिकाने 5 हजारांची लाच मागतानाची ऑडियो रेकॉर्डिंगच्या आधारावर नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सायकांळी उशिरा पर्यंत पंचायत समिती विभागात राहून एका कर्मचाऱ्यावर रंगेहात कार्यवाही सुरु आहे
शहरातील सेवानिवृत्त अर्जित रजेचे उर्वरित बिल काढण्यासाठी अर्ज केलेल्या जी. प. हायस्कुल हिमायतनगर येथील वरिष्ठ लिपिक दिलीप गजानन जाधव यांना पंचायत समितीच्या अर्थ विभागातील कनिष्ठ लिपिक प्रकाश शंकर वाघमारे यांनी त्यांचे बिल काढून देण्यासाठी पैसे मागितले त्या आधारावर नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दी 29 नोव्हेंबर रोजी सायकांळी उशिरा थेट पंचायत समिती कार्यालयात जाऊन कार्यवाही केली
बातमी लिही पर्यंत कुठलाही गुन्हा नोद झाला नाही व ह्या घटनेचा तपास हिमायतनगर येथील पोलीस स्थानकात सुरू आहे