हिमायत नगर शहरातील चौपाटी भागातील पोस्ट कार्यालयाजवळील जुगार अड्डा बंद करा नागोराव शिंदे यांची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी
हिमायतनगर / प्रतिनिधी
हिमायतनगर शहरात गेल्या अनेक दिवसापासून चौपाटी भागात जुगार अड्डा चालविण्यात येत असल्याने सदरील जुगार अड्डयावर दिवसभरामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून येथे जुगार खेळण्यासाठी दूरवरून लोक खेळण्यासाठी येत असून जुगारात पैसे हरल्याने अनेकांचे संसार देशोधडीला लागत आहेत गोरगरीब कुंटुब आपल्या सुखी संसाराला मुकत असल्याने प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष नागोराव शिंदे यांनी हिमायत नगर पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे जुगार अड्डा बंद करण्याची मागणी केली आहे