शेतकऱ्यांचे नगद पीक आले धोक्यात. कोरडी दूषित धूई पडत आहे.
व एकीकडे महावितरण कंपनीने चे तानाशाही चालू आहे.
हिमायतनगर.| कृष्णा राठोड
तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीवर रब्बीचे पीक घेतले जाते.व अस्मानी संकटाशी संघर्ष करताना शेतकरी दिसत आहे. महावितरण कंपनीने शेतकऱ्यांची लघू विद्युत खंडित केले जात आहे. व दुसरीकडे कोरडी दूषित धुई मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे. व तालुक्यातील लोकप्रतिनिधी आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये व्यस्त आणि महावितरण कंपनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात विज खंडित केले जात आहे.परंतू राजकीय मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून नवरी नवरदेवा सारखे बुरख्यात बसून आहे.व तूर हरभरा हळद गहू असे अनेक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पिक आहे. आणि तूर हा पिक मोठ्या प्रमाणात फुलावर आला आहे. परंतु कोरडी दूषित धुई आल्यामुळे तुरीचा नुकसान होत आहे. व हळद पिकावर कोरडी धुईमुळे मोठ्या प्रमाणात करपा रोग येत आहे. अतिवृष्टीने हवालदिल झालेला शेतकरी रब्बी पिकासाठी जोमाने शेतामध्ये राबताना दिसत आहे. परंतु महावितरण कंपनीचे तानाशाहीने शेतकऱ्यांचे शेतातील वीजपुरवठा खंडित केले आहे. अवकाळी पावसामुळे पहिलेच शेतकऱ्यांचे रब्बीची पेरणी उशिरा होत आहे. त्यामध्ये महावितरण कंपनीने मोठा संकट शेतकऱ्यांच्या समोर ठेवला आहे लघु विद्युत खंडन करून व.अतिवृष्टीचे अनुदान जाहीर झाले परंतु शेतकऱ्यांपर्यंत आणखीही पोहोचलेले नाही अनुदानाच्या मावेजा च्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. कधी मिळेल काही आणखी स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे सावकारा कडून काही उधार घेऊन रब्बीची पेरणी केली जात आहे. त्यामध्ये महावितरणाची तानाशाही च्या समोर हवालदिल होऊन शेतकरी राजा हातच टेकला असा दिसत आहे. सर्व शेतकरी वर्गाकडून शासनाला विनंती करण्यात येत आहे. की वीज बिल माफ करावी व लघु विद्युत खंडित करण्यात आलेला पुन्हा सुरळीत केल्यास शेतकऱ्यांची रब्बी पेरणी होऊ शकेल व रब्बी पीक तरी शेतकऱ्याच्या हाती येईल का अशी अपेक्षा शेतकरी केला जातो. महावितरण कंपनीने तानाशाही बंद करावी व शासनाने या कोरडी धुई चा पंचनामा करून शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.