हिमायतनगर | कृष्णा राठोड
शहरातील बालाजी माध्यमिक विद्यालय येथे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दि.21 नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सर्वांशी गाठी भेटी घेण्यासाठी दिवाळी स्नेह भोजन कार्यक्रमाचे निमंत्रण व एक कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीस उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार नागेश पाटील यांनी असे सांगितले की येणाऱ्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये जिल्हा परिषद,पंचायत समिती, सोसायट्या सह हिमायतनगर नगरपंचायतिच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी शिवसेना वाढीसाठी एकजुटीने राहून काम करा कोणत्याही सांजल्या संधीच्या माणसावर विश्वास ठेवू नका आज पर्यंत ज्यांना शिवसेनेने मोठे केले त्यांनी पक्षा सोबत गद्दारी केली त्यांना पक्ष येणाऱ्या काळात नक्कीच त्यांची जागा दाखवेल त्यासाठी आपण आप आपसातील मत भेद बाजूला ठेऊन काम करा नक्कीच या मतदासंघावर आपला झेंडा फडकेल असे बोलत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना व इष्ट मित्र परिवारांना दीपावलीनिमित्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम हिमायतनगर शहरातील बालाजी माध्यमिक विद्यालय बोरगडी रोड येथे दिनांक 21 नोव्हेंबर रोज रविवारी सकाळी 11 ते आपल्या आगमनापर्यंत असा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी व हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावून सर्व कार्यकर्त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजुटीने राहून शिवसेना वाढीसाठी काम करा असे आव्हान
यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे ,माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, बळीराम देवकते, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी सत्यव्रत ढोले, सुभाष शिलेवाड, शिवसेनाउप तालुकाप्रमुख विलास वानखेडे,किसान सेना तालुका प्रमुख प्रकाश जाधव, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे,सावन डाके, शहराध्यक्ष प्रकाश रामदीनवार, शिवसैनिक विठ्ठल ठाकरे ,बाळू अण्णा चौरे, राम नरवाडे,अनिल भोरे, नागेश शिंदे, पांडुरंग इंगळे गणेश पाळजकर,अरविंद पाटील शिरपलीकर, राजू बंडेवार ,शिवसैनिक संतोष फुलेवार, गजानन सूर्यवंशी, सूर्यवंशी सर, कपिल हराळे,जफर लाला,सलीम शेवाळ कर,योगेश चिल्कावार,विशाल राठोड,अमोल धुमाळे,श्रीराम माने पाटील, बाळु पाळजकर, शितल सेवनकर,सह आदी शिवसैनिक व युवा सेना कार्यकर्ते होते