कृषिमित्र पांडुरंग वाघमारे यांच्या खुनाची Xboxमार्फत चौकशी करा।मारोती अक्कलवाड तालुका अध्यक्ष कृषि मित्र संघटना हिमायतनगर यांची मागणी।
हिमायतनगर,प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोर्डी येथील आदिवासी समाजातील पांडुरंग मारोती वाघमारे वय 50 वर्ष यांची अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी खून केल्याची घटना तालुक्यातील चिंचोर्डी शिवरापासून अंदाजे 2.5 किमी अंतरावर असलेल्या जंगलात दि.२९ शुक्रवारच्या सकाळी घडली.
आदिवासींची शेती ही जवळपास 50% शेती हे डोंगराच्या पायथ्याशी दऱ्याखोऱ्यातील जंगलाच्या कडेला वसलेली आहे त्याच प्रमाणे पांडुरंग मारोती वाघमारे यांची शेती सुद्धा जंगळाच्या पायथ्याशी चारी बाजूने जंगल असलेल्या दऱ्यात असल्याने नेहमीच वन्यप्राण्यांचा मोठा त्रास असतो. रोही, पासुन शेतीचे रक्षण व्हावे व आपले हाताला आलेले पीक जाऊ नये म्हणून शेतकरी पत्नीसह शेतात राहत होता.नेहमी प्रमाणे हा शेतकरी सुद्धा रात्रीला जागलीला होता सकाळ झाली पत्नी घराकडे भाकरीसाठी आली असता तिकडे शेतकरी पांडुरंग वाघमारे हे जंगलात लाकडे आणण्यासाठी कुर्हाड घेऊन गेला होता.पत्नी जेंव्हा भाकर घेऊन गेली त्यावेळी पांडुरंग शेतात आढळून आले नाही. त्यानंतर त्यांनी फोन लावून पाहिला पती फोन उचलत नव्हते.म्हणून आईरा वैरा भटकट होती. गावात सर्वाना फोन लावून चौकशी करत शेतातील जंगलाच्या दिशेने गेले. शेताच्या काही अंतरावर जंगलात असलेल्या टेकडीवर अंदाजे ३ किमी अंतरावर त्यांचे प्रेत आढळून आले.
घटनेची माहिती मयताचे लहाने भाऊ शेषेराव मारोती वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे हे करत आहेत.