गणेश उत्सव काळात मंडळांनी सामाजीक उपक्रम राबवावेत – राजश्रीताई पाटि
नांदेड हिमायतनगर /- नागोराव शिंदे
गणेश उत्सव काळात मंडळांनी कोरोना विषयक जनजागृती जन हिताच्या दृष्टीकोनातुन, रक्त दान शिबीर, आरोग्य शिबीर सामाजीक उपक्रम राबवावेत असे आवाहन गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटिल यांनी केले, त्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मंडळांच्या सदस्यांशी चर्चा करतांना बोलत होत्या.
दि. ११ शनिवारी गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्रीताई पाटिल यांचा वाढदिवस होता, कोरोनामुळे यंदा छोटेखानी वाढदिवस साजरा करण्यात आला, वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी विविध पक्षाचे राजकिय मंडळी, कार्यकर्ते, सामाजीक संघटनांचे पदाधिकारी, हितचिंतक, शिवसैनिक, पत्रकार, गणेश उत्सव सुरू असल्याने विविध मंडळांच्या, सदस्य, विश्वस्तांचाही यात समावेश होता.
अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकांना मायेचा सागर, आपुलकीची खाण असलेल्या राजश्रीताई पाटिल प्रत्येकांना हितगुज करत होत्या यात प्रामुख्याने चर्चा केली ती गणेश मंडळांच्या सदस्य पदाधिकारी विश्वस्तांशी त्या म्हणाल्या, यंदा कोरोना च्या पार्श्वभुमीवर गणेश उत्सवावर निर्बंध आहेत सर्वांनी नियमांच पालन करून उत्सव साजरा करावा.कोरोना काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला वाईट परस्थितीतुन अनेकजन जात आहेत कोरोनातुन सावरण्यासाठी मंडळांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीराच आयोजन करून सामाजीक उपक्रम राबवावेत लोकमान्य टिळकांनी लोकजागृती साठी सुरू केलेला उत्सव सिमीत न ठेवता उपक्रमातुन दिर्घ स्वरूपात लोकहिताच्या दृष्टीकोनातुन उपक्रम राबवुन मंडळांनी अधिकाधीत पुढाकार घ्यावा असही त्या म्हणाल्या.यावेळी शिवाजीराव गावंडे, अजयराव देशमुख सरसमकर, शामराव पाटिल, राष्ट्रपाल सरोदे, अमोल चवरे, हिमायतनगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद गोडसेलवार, उपसरपंच संजय माझळकर, राणे यांचेसह आदिंची उपस्थिती होती.