हिमायतनगर शहरासह तालुक्यात पावसाने माजवला हाहाका रबाजारात खरेदीसाठी दवाखान्या मध्ये आलेल्या उपचाराच्या रुग्णांची झाली रस्त्या अभावी हेळसांड
हिमायतनगर नांदेड नागोराव शिंदे
हिमायतनगर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात आज दिनांक 7 रोजी दुपारी दोन ते चारच्या सुमारास झालेल्या ढग फुटी पावसामुळे नागरिकांसह प्रवाशांचे झाले हाल सविस्तर वृत्त असे की आज दुपारी झालेल्या ढगफुटी दृश्य पाण्याने पावसाने हिमायतनगर ते नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने चालू असल्याचे पुन्हा तिसऱ्यांदा प्रवाशांना पाहावयास मिळाले या झालेल्या पावसामुळे आणि संथ गतीने रस्त्याचे चालू काम असलेल्या गुत्तेदार यांच्या नाकर्तेपणामुळे नांदेड येथे जाणाऱ्या पेशंट सह शहरांमध्ये आलेल्या नागरिकांना या रस्त्याचे आदरवट बांधकाम पुलामुळे जनतेला नाहक त्रास भोगावा लागत असल्याचे आज प्रत्यक्ष दर्शनी पहावयास मिळाले आहे हिमायतनगर शहरालगत असलेल्या विसावा बार जवळचा पुलाचे काम सुरू केले नसल्यामुळे या फुलाच्या पाण्यामुळे माहिती सुविधा केंद्राच्या पायरीला पाणी गेले असल्याचे दिसत आहे तर शेकडो वाहण धारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला असल्याचे नागरीकातुन बोल्ल्याजात आहे