ब्युरो रिपोटहिमायतनगर / एस. के. चांद
हिमायतनगर पंचायत समितीच्या प्रशासकीय बदल्या झाल्याने पंचायत समितीचे प्रभारी मांजरमकर यांची बदली झाली त्या ठिकाणी गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी पदभार स्वीकारला आहे त्यामुळे त्यांना शुभेच्छा देऊन दिघी ग्रामपंचायतीच्या कामात लाखो रुपयांचा निधी मंजूर होऊन सुद्धा गावा मध्ये विकास न झाल्याने पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे तक्रार करण्यात आली होती सदरील चौकशी कधी होणार असल्याचे गटविकास अधिकारी यांनी लवकरच चौकशी करु असे आवाहन त्यांनी लहुजी शक्ती सेनेचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांना दिले.दिघी ग्रामपंचायत अंतर्गत पाणी फिल्टर मशीन सुद्धा चालू नसुन ते बंद पडली आहे गावातील दलितवस्ती या ठिकाणी नाली बांधकाम केले जात नाही कर वसुली केलेल्या रक्कमेची विनियोग कोठे केला आहे त्याची चौकशी करावी.दिघी ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या सर्व कामाची सखोल चौकशी करून दोषींवर दंडात्मक कार्यवाही करावी असे राजुभाऊ गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांना संवाद साधला आहे.