आमदार इंद्रनील नाईक यांच्या स्थानिक निधीतून काळी दौ साठी रुग्णवाहिका उपलब्ध.
ब्युरो रिपोट :-/ दौवलत काळी, यवतमाळ
काळी दौ परीसरातील जनतेला आरोग्य विषयी होणारी समस्या ला दुर करण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक धाऊन आले,त्यांनी आपल्या आमदार निधीतून एक रुग्णवाहिका काळी दौ सर्कल साठी उपलब्ध करून दिली, मागील अनेक वर्षापासून काळी सह परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका ची मागणी होती,नागरिकांना एखाद्या गंभीर पेशंट ला इतर दवाखान्यात हलवण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने खाजगी वाहनांची आधार घ्यावा लागत होता,काळी दौ येथील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावे, रुग्णांना वेळेत उपचार मिळावे, रुग्णांना तात्काळ उपचारासाठी घेऊन जाणे किंवा उपचाराच्या ठिकाणाहून घेऊन येणे, कोणत्याही रुग्णांना उपचारा अभावी त्रास सहन करावा लागू नये यासाठी रुग्णवाहिका कामी येणार आहे,आमदार ईंद्रनील नाईक यांनी आमदार निधीतून काळी दौ सर्कल साठी एक रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.
तालुका वैद्यकीय कार्यालय, पुसद येथे दिनांक १ जुलाई रोजी माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन स्थानिक विकास निधी मधून 2 रुग्णवाहिनी लोकर्पित करण्यात आल्या.एक रुग्णवाहिनी, तालुका वैद्यकीय कार्यालय, पुसद व दुसरी प्राथमिक आरोग्य केंद्र, काळी(दौ) ता. महागाव यांना हस्तांतरित करण्यात आली.
या वेळी आमदार इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भगवानरावजी आसोले, पुसद शहराध्यक्ष कय्यूम शेख, श्री विजयभाऊ जाधव, मा. सिराजभाई हिरानी, डॉ आशिष पवार उपस्थित होते.