महागांव येथे राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती उत्साहात साजरी केली.
ब्युरो रिपोट :- / महागांव, यवतमाळ,
महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणारे हरितक्रांतीचे प्रणेते कुळ सिलिंग कायद्याचे शिल्पकार रोजगार हमी योजनेचे जनक ज्यांच्या पावन पदस्पर्शाने महाराष्ट्र राज्याची मातृभूमी पुनीत झाली असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वंदनीय कै. वसंतरावजी नाईक साहेब यांची १०८ वी जयंती कृषी दिन म्हणून राष्ट्रीय बंजारा परिषद संघटना महागाव यांच्या वतीने वसंतरावजी नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित गोर बाळू राठोड युवा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद,अँड रविंद्र जाधव विधि जिल्हा अध्यक्ष प्रवीण जाधव सर तालुका सचिव, दिनेश जाधव तालुका संघटक, मनोज राठोड, विकास जाधव, अमोल चव्हाण,सचिन चव्हाण, सतीश जाधव, स्वप्निल राठोड, सुनील राठोड, नरेंद्र आडे, गोपाल चव्हाण,व राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेचे पदाधिकारी वसंतरावजी नाईक साहेब यांच्यावर प्रेम करणारे बंजारा समाज बांधवांनी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी हजेरी लावली