ताज्या घडामोडी

पुसद मार्फत मातृभूमी फाउंडेशन कडून आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य राजेश जी टोपे यांना SDO व निवेदन

 

ब्योरो रिपोट पुसद प्रतिनिधी :- मो.मुब्बसिर

पुसद मध्ये मागील काही दिवसांमध्ये कोरोना चा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे यामध्ये अनेक कोरोना संसर्ग झालेले रुग्ण पुसद मधील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी भरती होत आहेत परंतु अवघ्या काही दिवसांच्या उपचारानंतर कोरोना बाधित रुग्णांना भरमसाठ बिल आकारणी केल्याचे सर्वच रुग्णांना लक्षात येत आहे.
अनेक कोरोना बाधित रुग्ण खासगी रुग्णालयाच्या बिलाची धास्ती घेऊन घरीच स्वतःचा उपचार करीत आहे, यामुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढला देखील आहे आणि ह्यात अनेक जणांचा जीव देखील गेला आहे.
शासनाने कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी खाजगी हॉस्पिटल्स ला बिलासंदर्भात मर्यादा घालून दिल्या असल्या तरी ही काही हॉस्पिटल ची मनमानी सुरूच आहे.
काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना त्यांच्या येथील मेडिकल स्टोर मधूनच औषधी घेण्याकरिता आग्रह देखील करीत आहे. जे इंजेक्शन बाहेर 1500 ला मिळते ते 4500 ला लावत आहेत.

पुसद हे उत्तम वैद्यकीय सेवेसाठी सुप्रसिद्ध आहे आणि निश्चितच आपले अनेक वैद्यकीय सेवा देणारे आदरणीय डॉक्टर्स ही मागील अनेक वर्षापासून पुसद मधील आणि पुसद तालुक्यातील रुग्णांची सेवा करीत आहे परंतु काही खासगी रुग्णालयांच्या व्यापारीकारणामुळे आणि मनमानी कारभारामुळे पुसद मधील वैद्यकीय क्षेत्राचं नाव खराब होत आहे.
मी सर्व सन्माननीय डॉक्टर्स चा आदर करतो परंतु या पुढे जे डॉक्टर्स कोरोना रुग्णाची आर्थिक लूट करताना दिसेल किंवा गरीब होतकरू रुग्णांसोबत उपचाराबाबत हलगर्जी करताना जे डॉक्टर्स आढळेल त्यांच्या निषेधार्थ मातृभूमी फाऊंडेशन आंदोलन करेल याची नोंद घ्यावी उपस्थित मातृभूमी फाउंडेशन अध्यक्ष सतीश शेवाळकर सचिव विशाल कांबळे उपाध्यक्ष शैलेश उत्तरवार सदस्य संतोष पेंढारकर हरीश चौधरी कुणाल तूंडलायत व सामाजिक कार्यकर्ते संजय हनवते
मातृभूमी फाऊंडेशन पुसद

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *