नांदेड प्रतिनिधी :- एस.के.चांद
महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवुन,
महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणा-या महाराष्ट्रद्रोही आघाडी सरकार निषेधार्थ शुक्रवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक 11 वा खा प्रतापराव पाटील चिखलीकर मा जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव पाटील गोजेगावकर सर्व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आज मोठे जन आंदोलन 33 केवी येथील उपविभागीय कार्यालय हिमायतनगर येथे उपविभागीय अभियंता मा नागेश लोणे साहेब शहर अभियंता मा पवन भंडगे याना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये हिमायतनगर तालुक्यातील घरगुती ग्राहक व छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना अवाच्या सव्वा बिले देऊन मोठी अडचण महावितरण कंपनी मार्फत करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज मोठे जनआंदोलन हिमायतनगर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आले होते या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी अशी की कोरोणा काळामध्ये राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या लाईट बिल माफी बाबत जे वक्तव्या त्यांनी केले होते त्याबद्दल घुमजाव केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे तसेच हिमायतनगर तालुक्यात घरगुती व्यापारी शेतकरी असे एकूण 29 हजार 696 ग्राहक आपल्या तालुक्यात आहेत त्यांना दोन-दोन महिने रिडींग न घेतल्यामुळे आवरेज बिल दिल्यामुळे मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहेत तसेच रेडींग घेणारे यंत्रणा अतिशय कामचुकार पद्धतीची काम करीत आहे व तसेच शेतकऱ्यांना पाच सहा महिन्यापासून शेतातील डीपी संदर्भात सुद्धा थोडी अडचण महावितरण निर्माण करीत आहेत याबाबत सुद्धा तातडीने निर्णय घेण्यात यावे व शेतकऱ्यांच्या शेतामधील विद्युत विभागामार्फत थ्री फेस विद्युत पुरवठा करण्यात येते त्या विद्युत कनेक्शन घेतलेल्या शेतकऱ्यांना हिमायतनगर तालुक्यात रात्रीच्या वेळी सुद्धा सिंगल फेज लाईट बारमाही कायमची कारण यावे तसेच विद्युत विभाग मंडळामार्फत जे विजबिल बाबत 18 % व्याज आकारणी करण्यात येत आहे ती कायमची रद्द करण्यात यावी अशा अनेक शेतकऱ्याच्या घरगुती व्यापारी यांच्या अडचणींबाबत आज भारतीय जनता पार्टी मार्फत तला ठोको हल्ला बोल आंदोलन करण्यात आली या आंदोलनाची नेतृत्व भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या सह शहराध्यक्ष खंडु चव्हाण कांता गुरू वाळके राम सूर्यवंशी किशोर किशोर रायेवार अहेमतभाई पटेल परमेश्वर सूर्यवंशी विनायक ढोणे सुभाष माने सचिन कोमावार हानु ठाकूर ज्ञानेश्वर शेवाळे राम जाधव सोशल मिडीया प्रमुख नितीन मुधोळकर बालाजी ढोणे गंगाधर मिरजगवे अजय सुकुलवार प्रशात ढोले पोशटी जाधव परमेश्वर जाधव विशाल जाधव निलेश चटणे आदित्य अंबीलगे सुरज चिंतावार यांच्यासह सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथ प्रमुख सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित..