( हिमायतनगर/ प्रतिनीधी )
मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजाभाई सूर्यवंशी यांच्या आदेशावरून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. सूर्यकांत तादलापुरकर व मराठवाडा उपाध्यक्ष शंकरसिंह भाऊ ठाकूर यांनी हिमायतनगर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामध्ये मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणारे राजूभाऊ गायकवाड यांची मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. सूर्यकांत भाऊ तादलापुरकर म्हणाले की संघटना जिल्ह्यामध्ये जोमाने वाढवून समाजावर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण खंबीरपणे उभे रहावे. संघटना आपल्या सोबत खंबीरपणे उभी आहे.निवडीच्यावेळी त्यांना सर्व उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. सूर्यकांत भाऊ तादलापुरकर, मराठवाडा उपाध्यक्ष शंकरसिंह भाऊ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी जोंधळे साहेब, निलेश भाऊ तादलापुरकर, आकाश भालेराव, श्याम कांबळे, शिवाजी नुरुंदे, प्रेमदास वळसनकर आदी उपस्थित होते .
राजुभाऊ गायकवाड यांच्या निवडीबद्दल जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.