आरोग्य

पैनगंगा अभयारण्यात बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या आले आढळून

पैनगंगा अभयारण्यात बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या आले आढळून

बिटरगांव : प्रतिनिधी

पैनगंगा अभयारण्यातील बिटरगांव वनपरिक्षेत्रात बिबटाचा नैसर्गिक मृत्यु झाल्याची घटना गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले . त्यावेळी सहाय्यक वनसंरक्षक ( वन्यजीव ) पांढरकवडा , वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन्यजीव ) बिटरगांव व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्वरीत घटनास्थळ .गाठले .

दि .१ रोजी गस्तीवर असलेल्या पथकाला ही घटना लक्षात येतात सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले . यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वासमक्ष पाहणी केली . यावेळी बिबट्याची नखे , दात व इतर आवयवसाबुन होते .या बिबटाचे वय अंदाजे ४ते ५ वर्ष असुन त्याचा मृत्यू ५ते ७ दिवसा पूर्वी झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला . प्राथमिक अंदाजा नुसार बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज काढला .मृत्यू झालेल्या बिबटाचे मोक्यावरच दहन करण्यात आले .

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन्यजीव ) बिटरगांव ओमप्रकाश पेंदोर  , सहाय्यक वनसंरक्षक ( वन्यजिव ) पांढरकवडा संदिप चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी ढाणकी कुंभार, पशुवैद्यकीय अधिकारी कोरटा व वनविभागाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *