राजकारण

हिमायतनागर नगर पंचायत मुख्याधिकारी दारिद्र्य रेशेचे कार्डावर सही करीत नसल्यामुळे अनेक गोर गरीब निराधार अनुदानपासुन वंचित मा.आमदार व नगर अध्यक्ष नगरसेवक यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

हिमायतनगर परिसर वार्तापत्र

ब्योरो रिपोट (स. अ. मन्नान)

हिमायतनगर शहरातील व परिसरतील अनेक शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ति योजनेचा लाभ मिळाला परंतु,

सन 2009 2013 2014 या तत्कालीन फडणवीस सरकार च्या काळात ज्यांनी पिक कर्ज उचलले आहे.त्यांचे सतत चे नापिकी मुळे कर्जाची परत फेड बँक मध्ये करू शकले नाही.

अश्या शेतकऱ्यांचे बैंकेंनी कर्ज k. C. c. चे खाते होल्ड करुण त्यांचे आधार लिंक न झाल्यामुळे,या तांत्रिक व कायद्याचे अडचणी मुळे त्यांचे पिक कर्ज माफ झाले नाही.

त्यामुळे त्या शेतकर्यावर अन्याय करक असून, त्यांना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरित आहे.

आणि त्यांचे पूर्वगटन करुण खाते पूर्ववत चालू करुण देने क्रमप्राप्त आहे.

व तसेच शासन त्यांना आदेश द्यावे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धावजी ठाकरे साहेब
व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सद्धयाचे सार्वजानिक बांधकाम मंत्री मा. ना.अशोकराव चव्हाण साहेब
हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवरावजी पाटिल जवळगावकर साहेब

यांनी व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दुय्यम निबंधक
यांनी विशेष लक्ष द्यावे व खलील प्रमाणे हवादिल चिंतातुर अन्याय ग्रस्त शेतकरी जमील अहेमद महम्मद यूनुस मारोती शामराव कत्तुलवार
सुलोचना मारोती कत्तुलवार,शेख मोईन शेख यासिन शफी अहेमद वली अहेमद यांचे सह असंख्य शेतकर्यांनी मागणी केली आहे. तसेच लेखी निवेदन हि तहसील कार्यालय व निबंधक कार्यालय हिमायतनगरव शासनकड़े दिले आहे.

हिमायतनागर नगर पंचायत मुख्याधिकारी दारिद्र्य रेशेचे कार्डावर सही करीत नसल्यामुळे अनेक गोर गरीब निराधार अनुदानपासुन वंचित मा.आमदार व नगर अध्यक्ष नगरसेवक यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

या बाबत सविस्तर वृत असे की,
हिमायतनगर शहर हे ग्रामपंचायत अस्तित्वात होती तद नंतर ग्रा.प. चे नगर पंचायत मध्ये रूपांतर शासनाने केले आहे.
व शाहराची दारिद्र्य रेषे खालील यादि हि सन 2003 2007 ची असून त्यानंतर सन मध्ये नगर पंचायत झाली आहे.।
ग्रा. प. असतांना गटविकास अधिकारी सही करीत असत पण,सदर हिमायतनगर शहर नगर पंचायत झाल्यामुळे, ते जुन्या यादीनुसार सही करीत नाही.

वास्तविक पाहता प. स. ची सदर यादि व् बुकलेट नगर पंचायत ला पठविले परंतु त्यावर सीओ सही करीत नाही .

त्यावर नगर अध्यक्ष सही करतात परंतु तहसिल मध्ये ते स्विकारत नाही. व पुन्हा लाभधारकांना सही साठी फाइल त्रुटि काढून नगर पंचायत ला पाठवितात त्यामुळे नागरिकांना राष्ट्रिय कुटुंब अर्थसाह्य योजना व श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजने पासून वंचित रहावे लागत आहे.

म्हणुन,हदगाव/हिमायतनगर तालुक्याचे आमदार मा. माधवराव जी पाटिल जळवगावकर साहेब
नगर अध्यक्ष कुणाल राठोड, उपनगर अध्यक्ष मो. जावेद

व सर्व नगर सेवक यांनी या बाबित विशेष लक्ष घालून मुख्याधिकारी यांना रेकॉर्ड यादि नुसार दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्रावर मुख्याधिकारी यानां सही करण्यास सूचना द्यावी अशी मागणी होत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *