विशेष प्रतिनिधी / हिमायतनगर
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक स्वच्छालय रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या गेल्या दहा वर्षातील तत्कालीन सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी संगनमताने सवना ज ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून काहींना दुबार लाभ दिला तर काही लाभार्थ्यांचे परस्पर शौचालयाची रक्कम संगनमतांनी उचललेली असल्याने काहीचे शौचालय बांधकाम न करता ही बनावट सह्या मारून त्यांची रक्कम परस्पर उचललेली आहे या दोषींची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा 2 सप्टेंबर पासून सवना(ज) येथील गावकरी हिमायतनगर तहसील कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे नायब तहसीलदार ए एम तमासकर यांना दिनांक 14 ऑगस्ट रोजी दिला आहे
गेल्या दहा वर्षात शौचालयाच्या विविध योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या यादीची पडताळणी करून तत्कालीन सरपंच ,उपसरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी संगनमताने शौचालयाच्या विविध योजने मार्फत अंदाजे चार ते पाच लाखांचा भ्रष्टाचार करून शासनाची व लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे असे एका निवेदन द्वारे म्हटले आहे या दोषींची तात्काळ उच्च स्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा 2 सप्टेंबर पासून हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सोशल डिस्टंसिंग ठेवून आमरण उपोषण केले जाणार असल्याचा इशारा दि 14 ऑगस्ट रोज शुक्रवारी एका निवेदनद्वारे नायब तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
निवेदनावर स्वाक्षऱ्या खालील निवेदन कर्त्यांच्या आहेत
यावेळी बालाजी आलेवाड, कैलास अंनगुलवार, आनंदराव राऊत,लक्ष्मण राऊत,नारायण हटकर,मधुकर पंडित,विनोद राऊत देवानंद बिलेवाड रामदास फेदेवाड,विजय गायकवाड संतराम आलेवाड, लक्ष्मन पैलवाड, रंगराव गुंडेलवार, शंकर तीवाळे, मोहनाजी वाछतवार, माधव अंनगुलवार, परमेश्वर अहिरवाड, शंकर गोपतवाड,गजानन गोपेवाड विलास बिरकलवाड, पोशटी अंनगुलवार, प्रकाश आहीरवाड, लक्ष्मण परसराम, प्रकाश अंनगुलवार ,बंडूभाऊ अंनगुलवार,विशाल अंनगुलवार,विठ्ठल गुंडेकर सह आदी जण उपस्थित होते