प्रेस क्लब आर्णी ची बैठक संपन्न जुनेच पदाधिकारी तूर्तास कायम
यवतमाळ आर्णी / इरफान रज़ा
पदाधिकारी नियुक्ती व नवीन सदस्यांना सामील करण्याबाबत आर्णी प्रेस क्लबची बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीत जुन्याच पदाधिकाऱ्यांना पुढील बैठकी पर्यंत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नव्याने पाच पत्रकारांना प्रेस क्लब मध्ये सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बारा वर्षापासून सामान्य जनतेच्या समस्या सातत्याने प्रशासनासमोर मांडून त्याला वाचा फोडण्याचे काम आर्णी प्रेस क्लब करीत आले आहे. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून प्रत्येक वर्षी नवीन सदस्यांना पदाधिकारी व सदस्य बनविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येते. मात्र काही कारणास्तव या वर्षी स्वतंत्रदिना निमित्य बैठकीचे आयोजन न झाल्याने आज दि. 16 ऑगस्ट ला बैठक संपन्न झाली. मात्र बहुतांश सदस्यांच्या अनुपस्थितीमूळे नवीन पदाधिकारी यांची निवड न करता पुढील सभेपर्यंत जुन्याच पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रफिक सरकार (देशोन्नती), जाफर शेख (लोकशाही वार्ता), आरिफ शेख (युवराष्ट्र दर्शन), प्रफुल जाधव (दै. सायरन), अक्रम सय्यद (दै.महासागर) या पाच नवीन सदस्यांना प्रेस क्लब चे सदस्यत्व देण्यात आले आहे. नवीन सदस्यांचे आर्णी प्रेस क्लबचे अध्यक्ष नौशाद अली, उपाध्यक्ष गणेश हिरोळे, सचिव आबीद फानन, माजी उपाध्यक्ष विनोद सोयाम यांनी अभिनंदन केले.