आरोग्य

हिमायतनगर शहर आठवडा भर कडकडीत बंद राहणार तहसीलदार एन बी जाधव सर्वानी नियमांचे पालन करा,

प्रशासनाह महसूल प्रशासनाला सहकार्य करा

विशेष प्रतिनिधी / नागोराव शिंदे

हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील व्यापारी यांना सुचीत करण्यात येतील की, जिल्हाधिकारी यांनी दि.12 च्या मध्यरात्रीपासुन, अर्थात दि 13 च्या सकाळपासुन ते दि.20 पर्यत म्हणजे 8 दिवस शहरातील किराणा, हॉटेल, रेडीमेड, कापड, इलेक्ट्रिकस, इलेक्ट्रॉनिक्स, बेकरी, मोटारगरेज, हार्डवेअर, जनरल स्टोअर्स,मेन्सपार्लर, ब्युटीपार्लर, अटोमोबाईलस सह आदी संपूर्ण व्यवहार आठवडाभर कडकडीत बंद राहणार आहेत असे आवाहन हिमायतनगरचे तहसीलदार एन बी जाधव साहेब यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की वरिल नियमांचे पालनाची सर्व नागरिकांनी व व्यापर्यांनि नोंद घ्यावी

यामध्ये शहरात दुग्ध व्यावसायिक, फळविक्रेता, भाजीपाला हे एका ठिकाणी न थांबता कॉलनी,गलोगली, फिरुन सकाळी 8:00 ते दुपारी 2:00 पर्यत विक्री करनार आहेत त्यात शेतीविषयक औजारे, कृषीचे सिड्स, फर्टिलायझर्स,औषधीचे दुकान सकाळी 8:00 ते दुपारी 2:00 वाजे पर्यत सुरु रहातील.
मेडिकल, शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालये हे दिवसभर सोशल डिस्टेन्सनुसार सुरु राहतील.
तरी सर्व नागरिकांनी हे बंद लक्ष्यात घेऊन अतिआवश्यक किराणा व इतर खरेदी, सामान जेणे करून आपल्याला आठ दिवस पुरेल ते घेवुन ठेवावे.
या बंद दरम्यान विनाकारण रस्त्यावर न येता कोरोना वायरसची साखळी तोडण्यासाठी व तालुका आरोग्याच्या दृष्टीक्षेपातुन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी शासनास सहकार्य करावे असे आवहान हिमायतनगर तहसीलदार यांनी केले आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *