क्राईम डायरी

ढाणकी शहरात बोगस सोयाबीन बियाणे देणाऱ्या कृषी केंद्राला शेतकऱ्यांचा घेराव, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

 

आमदार ससाने यांच्याकडून शेतकऱ्यांची निराशा

ढाणकी प्रतिनिधी
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मृग नक्षत्र लागताच पावसाची दमदार हजेरी लावली व त्यामुळे बळीराजा सुखावला. सर्वत्र पेरणीची लगबग चालू होऊन आधीच कोरोना, लॉकडाऊन या मुळे पिचून गेलेल्या शेतकरी राजाने व्याजाने, कर्ज काढून सोयाबीन चे बी बियाणे आणले आणि शेतात पेरले, मात्र ते बियाणे उगवलेच नसल्याने सावळेश्वर, करंजी, मेट व ढाणकी परिसरातील शेतकरी हतबल झाले असून या प्रकरणी कृषी केंद्र चालकांची चौकशीची मागणी शेतकरी करत आहेत.

दराटी ,मेट ,सावळेश्वर ,निंगणुर ,करंजी, बिटरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी ढाणकी येथील कृषी केंद्रातून सोयाबीन चे बियाणे विश्वासाने खरेदी केले व आपल्या शेतात पेरले मात्र ते बियाणे उगवले नसल्याने संबधित शेतकऱ्यांनी कृषी केंद्र गाठून ही आपबिती सांगितली तेव्हा या बाबत उमरखेड तालुका कृषी विभागाकडे तक्रार देण्याचा सल्ला दुकानदाराने दिला. त्या मुळे हतबल झालेल्या बळीराज्याने याची तक्रार कृषी विभागाकडे केली असून शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला कोण देणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे? आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर आता पुन्हा दुबार पेरणीचे संकट आल्याने पैस्याची व्यवस्था कशी करायची? हा सुद्धा मोठा प्रश्न शेतकऱ्यांत निर्माण होत आहे.

आमदार ससाने शेतकऱ्यांचे अडीअडचणी सोडविण्याकरिता परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात सेल्फी घेण्यापुरतेच फिरत असल्याचे दिसत आहे अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे बोर्ड न देता शेतकऱ्याची हाल होत असताना जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना याविषयी कोणताच निर्णय आमदार नामदेव ससाने घेत नसल्याचे परिसरातील शेतकरी सांगताना फिरत आहे गत काही दिवस आगोदर कृषी केंद्र चालकांनी भुईमुगाची बोगस बियाणे शेतकऱ्यांना दिले त्या भुईमुगाला केवळ ११ फळ आल्याने शेतकऱ्यांनी हा प्रश्न आमदाराकडे मांडला आमदार नामदेव ससाने या प्रश्नावर कोणत्याच प्रकारे निर्णय लावला नसल्याने शेतकर्‍यांची मोठी निराशा झाली असे शेतकरी सांगत आहेत ज्या कंपनीचे सोयाबीन उगवले नाही त्या कंपनीने सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

काही दिवसापूर्वी दराटि तसेच परिसरातील शेतकरी सुद्धा अश्या भुईमुगाच्या बोगस बियाणांचे शिकार झाले होते. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे बोगस बियाणे विक्रेते आपल्या लालसेपोटी विक्रीला आणतात त्यामुळे शेतकऱ्यांची नुकसान होत आहे उमरखेड तालुका कृषी विभाग मुग गिळूण गप्प बसला की काय ? हा प्रश्न उपस्थित होत आहे असून यवतमाळ जिल्हा कृषी विभागाने लक्ष घालून योग्यती कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी ढाणकी परिसरातून मागणी होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *