आरोग्य

सत्यनिर्मिति महिला मंडळ तर्फे सफाई कामगार व कर्मचारी यांना कोरोना योद्धा सम्मानपत्र देऊन सत्कार सम्पन्न

 

उमरखेड़(ता प्र):-कोरोना महामारित सम्पूर्ण देश लॉक डाउन असताना आपल्या जिवाची पर्वा न करता सर्वात महत्वाची सेवा देणारे सफाई कर्मचारी सफाई कामगार महिला व पुरूष यांनी सर्व नागरिकांना सेवा दिली व स्वछता कायम ठेवली अश्या खरे कोरोना योद्धा चे सत्कार करने आवश्यक समजून उमरखेड़ शहर यवतमाळ जिल्ह्य महाराष्ट्र च्या एकमेव महिला सशक्तिकरण व महिला अधिकार सम्मान साठी सतत संघर्ष करणारी सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ यांनी नगर परिषद उमरखेड़ येथील सर्व सफाई कामगार यांचे प्रत्यक वार्ड मधे महिला मंडळ सदस्य व पद अधिकारी यांनी सम्मान सत्कार केले सफाई कामगार यांना शॉल पुष्पगुच्छ मिठाई व कोरोना योद्धा सम्मान पत्र देऊन सम्मानित करण्यात आले,

 

उमरखेड़ नगर परिषदेतील तातार शाह वार्ड डॉ ज़ाकिर हुसैन वार्ड जुम्मा मजीद वार्ड शिवाजी वार्ड आज़ाद वार्ड सदानंद वार्ड संत गजानन वार्ड जवाहर वार्ड गांधी वार्ड चोखा मेला वार्ड भगतसिंग वार्ड तसेच इतर वार्ड मधील सफाई कामगार यांना कोरोना योद्धा सम्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आले या सत्कार समारम्भ करते वेळेस समाजिक दूरी चे पूर्ण पने पालन करण्यात आले,

या कोरोना सत्कार संम्मान सत्यनिर्मिति महिला मंडळ संस्थापिका अध्यक्षा सौ शबाना खान यानी केले व उपाध्यक्षा सौ राखी मगरे, सचिव सौ सीमा खंदारे,सह सचिवा सौ रेहाना दादू, कार्यध्यक्षा सौ डॉ वंदना कदम,सल्लागार कु मनीषा भारती, सदस्या सौ रेहाना सिद्दी,कु अर्चना बोराडे,सौ तबस्सुम सय्यद, सौ मुब्सशिरा काज़ी,सौ शाहीन पठान,सौ शारदा खंदारे,सौ सविता भागवत,सौ भाग्यश्री,कु भक्ती लांडगे,कु भक्ति डागा, सौ गाडगे,सौ आसिया पठान व सर्व सदस्या यांनी आप आपल्या वार्ड मधे सत्यनिर्मिति द्वारा सफाई कामगार व कर्मचारी यांचे सम्मान पत्र देऊन व शॉल श्रीफल मिठाई देऊन सत्कार केले व खऱ्या कोरोना योद्धा यांचे सम्मान केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *