ढाणकी शहर प्रतिनिधी //
पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजावर सुनियोजितपणे हल्ले होत असुन दोषींवर कडक कार्यवाही करण्याऐवजी त्यांना आश्रय देण्याचे काम शासन प्रशासन करीत आहे.
नागपूर जिल्ह्य़ामध्ये नाथ पवनी येथील अरविंद बनसोडे या बौद्ध तरुणाची शुल्लक कारणावरून हत्या करण्यात आली. तसेच पिंपरी चिंचवड येथे विराज जगताप या तरुणाची प्रेम प्रकारातून सुनियोजितपणे हत्या करण्यात आली.
या दोषींवर सीबीआय मार्फत कडक कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन सुमेध बोधी विहार समिती तर्फे तहसीलदार रूपेश खंडारे उमरखेड यांना देण्यात आले.
सुमेध बोधी विहार समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल काळबांडे, सचिव भीमराव सोनुले, इतिहास संशोधक प्रेम हनवते, प्रा.गजानन दामोदर, संतोष निथले, वीरेंद्र खंदारे, उत्तमराव शिंगणकर, सारनाथ रोकडे, बाळराज काळबांडे, इत्यादी सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदन देवुन दोषींवर कार्यवाहीची मागणी केली.