तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करा.जिल्हा प्रशासनाकडे भागवत देवसरकर यांची मागणी
नांदेड हिमायतनगर
विशेष प्रतिनिधी
नागोराव शिंदे
खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, पेरणीसाठी खते बिबियाणे औषधे खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करत आहे,कोरोनाव्हायरस मुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे,शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, खते बी-बियाणे खरेदीमध्ये फसवणूक होण्यासाठी व बोगस बियाणे खते कीटकनाशके यांची जादा दराने विक्री होऊ नये व कोणत्याही प्रकारची शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये याबाबत ग्रामस्तरावर आवश्यक ती दक्षता घेण्यासाठी, तसेच कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढू न देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलन्यासाठी ग्रामीण भागातील शासनाची महत्त्वाची पदे असलेली तलाठी,ग्रामसेवक, कृषीसहायक यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा नांदेड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य भागवत देवसरकर यांनी केली आहे.
कोरोनाव्हायरसने ग्रामीण भागात सुद्धा आता पाय रोवले असून बाहेर घेऊन आलेल्या व्यक्तीमुळे ग्रामीण भागातल्या व्यक्तींना कोरोना संसर्गाची लागण होत आहे, जिल्ह्यात अशी बरीच प्रकरणे सापडली असून याबाबत शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहिली तर आवश्यक ती दक्षता,काळजी घेऊन कोरोणाचं संसर्ग ग्रामीण भागात कमी होऊ शकतो,यासाठीच गावातील प्रमुख शासकीय कर्मचारी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांनी मुख्यालय राहणे गरजेचे आहे.
येणाऱ्या खरीप हंगामात शेतकर्यांना खते बियाण्याची कुठलीही अडचण होणार नाही व पेरणी करता शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी कृषी सहायकांनी त्यांच्या मुख्यालयी मुक्कामी राहून मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, व खरीप हंगामात त्यांना पेरणीसाठी फायदा होईल याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ योग्य ती पावले उचलून ग्रामसेवक तलाठी कृषी सहायक या तिघांनाही मुख्यालय राहणे बंधनकारक करावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढावा अशी आग्रही मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.