हिमायतनगर (प्रतिनिधी)
नांदेड शहरातील वसरणी भागातील दुध डेअरी चौकातून एका चार चाकी वाहनामध्ये 34 लाख रुपये किंमतीचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पडकला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला, असून ही कारवाई बुधवार दि. 6 रोजी करण्यात आली.
नांदेड शहरातून गुटख्याची गाडी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार दुध डेअरी परिसरातून जात असलेल्या गाडी क्रमांक (एम.एच.-26-बी.ई.4064) या गाडीवर छापा मारत पोलिसांनी सागर पानमसाला चाळीस पोते, एस.आर.तंबाखू दहा पोते असा 34 लाख व बारा लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण 34 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला, असून चालक हिमायतनगर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या पथकाने केली.