तुळशी आश्रम शाळेतर्फे वाई बाजार येथील कोलामखेडा येथे आदिम समाजाला धान्य किट वाटप
प्रतिनिधी रुपेश मोरे (माहुरंगड)
वाई बाजार लगत असलेल्या तुळशी येथील आश्रम शाळे तर्फे वाई येथील कोलामखेड याठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ तर्फॆ ग्राम पंचायत वाई बाजार कोलामखेड येथील आदिम समाजाला धान्याचे किट वाटप करन्यात आले यात सहा की. गहू, तिन,की.तादूळ, एक की.गोड तेल, एक की.दाळ,चटणी, मिठ, मसाला अदि आत्यावश्यक वस्ंतुचा समावेश असून किमान चाळीस ते पंचेचाळीस कुटूंबाना ते वाटप करण्यात आले वाटप करताना सोशल डिस्टन्स ची काळजी घेन्यात आली.
कोरोनाच्या पार्शवभूमिवर शासनाच्या आदेशानुसार सर्वत्र लॉक डाऊन झाल्याने शाळेत विद्यार्थ्यांसाठी आलेला अन्नधान्य साठा निकामी होऊ नये म्हणून संबंधीतअधिकार्या ची परवानगी घेत शाळेत जमा असलेला अन्नधान्य साठा वाई बाजार येथील कोलामखेड येथील आदिम समाजाच्या 45 घरांना वाटप करण्यात आला.
याप्रसंगी अश्रम शाळेचे मुख्याध्यापक,चहाने सर,तलाठी विश्वास फड,मंडळ अधिकारी टी .आर .सुगणे,व वाई गावातील उपसरपंच हाजी उस्मान खान,माजी उपसरपंच मजीद खान यांच्या हस्ते वाटप करन्यात आले.