ग्लोबल इंटरनेशनल फॉउंडेशन समिति विदर्भ उपाध्यक्षा पदी सत्यनिर्मिति महिला मंडळ संस्थापिका सौ शबाना खान यांची नियुक्ति
( उमरखेड -:- इरफान शेेेख, )
कोरोना विषाणु महामारित सर्व विश्वात आपली समाजिक भागीदारी,उपस्थिति व सहायता देणारी इंटरनेशनल संस्था भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त सम्पूर्ण विश्वात महिला अधिकार,मानव अधिकार बाल कल्याण,सामाजिक न्याय,सैनिक कल्याण आयोग,पोलीस यूथ कल्याणकारी आयोग,ग्राहक सरक्षण,जयेष्ठ नागरिक कल्याण,भ्र्ष्टाचार निर्मूलन,अन्न भेसल जागरूकता,विश्व आरोग्य कल्याण,वन सरक्षण आयोग,एनिमल प्रिटेक्शन,
अभियान,शेतकरी कल्याण,अपंग कल्याण,बेटी पढ़ाओ बेटी बचाओ आयोग,युवा बाल कल्याण आयोग, तसेच सर्व सामाजिक कल्याण हितार्थ सर्व जगात निस्वार्थ कार्य करणारी ग्लोबल इंटरनेशनल फॉउंडेशन समिति ने महाराष्ट्र विदर्भ मधे निस्वार्थ सेवा देण्या करिता विदर्भ समिति गठित केले असून समाजिक क्षेत्रात कार्य करणारे समाजिक कर्तकर्ता यांच्या मार्फ़त नागरिकांच्या सेवे साठी विदर्भ समिति गठित करण्यात आली व यवतमाळ जिल्ह्यात महिला सक्ष्मी संस्था सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या अध्यक्षा सौ शबाना खान यांना विदर्भ उपाध्यक्षा पदी नियुक्त करण्यात आले,
शबाना खान यांच्या देशात लॉक डाउन कोरोना विषाणु वेळी सामान्य जनतेच्या निस्वार्थ सेवा व कोरोना महामारी जनजागृति अभियान व सेवा देऊन प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल ही नियुक्ति करण्यात आली विविध सामाजिक क्षेत्रातील वरिष्ठ समाज सेवक यांचीही या वेळी नियुक्ति करण्यात आली सौ शबाना खान यांची नियुक्ति ग्लोबल इंटरनेशनल फॉउंडेशन समिति राष्ट्रीय अध्यक्षा मनीषा ठाकरे यांनी दिल्ली मुख्य कार्याल्यातुन मेल द्वारा नियुक्ति पत्र देऊन नियुक्ति केली,
व विदर्भाची जनकल्याण जबाबदारी दिली या वेळी उमरखेड तालुक्यातील एका सामान्य महिलेची अश्या महत्वपूर्ण जबाबदार पदावर नियुक्ति झाल्या बद्दल विदर्भातील विविध समाजिक क्षेत्रातील समाज सेवकानी स्टे होम सोशल मीडिया व दुर्ध्वनी द्वारे शबाना खान यांचे अभिनंदन करण्यात आले.