यवतमाळला मधील लोहारा, आनंद नगर, पिंपळगाव, उमरसरा लोकांना पूर्ण राशन किटचे वाटप जवळ पास पन्नास कुटुंबातील लोकांना दिले,
प्रतिनिधी, यवतमाळ
आज देशावर कोरोना संशदमुळे लोक घरी राहतात त्या गरजू लोकांना अन्नधान्याचा पूर्ण किट वाटप आज करण्यात आली। प्रा.मिनाक्षी सावळकर पानझाडे या परिवाराकडून पाच किलो गव्हाचं पीठ, दोन किलो तांदूळ, एक किलो तेल, मुगाची, उडीद,दाळ, तुरदाळ,मसुरदाळ,आणि साबुदाणा अर्धा किलो,व बेसन अर्धा किलो, तिखट अर्धा किलो, हळद मसाला 100 ग्राम,आणि पोहे अर्धा किलो, बरबटी, मटकी, वटाणे , सोयाबिन वड्या,अर्धा किलो पापड पाकीट,प्रत्येकी एक लोंच पॅकेट,एक मीठाचा प्याकेट, डेटॉल साबुन, या सर्व वस्तू यवतमाळ मधील लोहारा,आनंद नगर,पिंपळगाव, उमरसरा येथे नागरिकांना,प्रा.मिनाक्षी सावळकर पानझाडे,यांनी स्वतःच्या खर्चाने राशन किटचे वाटप केला, लोकांनी घरा बाहेर निघू नये यासाठी स्वयंभू मिनाक्षी सावळकर परिवारांनी हा उपक्रम केला राबिवला आहे,नागरिकांनी घरीच राहावे .कोरोनाचि साखळी तोडावि हे ध्येय समोर ठेउन व कोणिही ऊपासी राहु नये या साठी,हा एक छोटासा उपक्रम करण्यात आला होता, या बिकट परिस्थिती स्वता अम्ही व आमचा परिवार यांच्या सोबत आहे.