पोत्रा सिंदगि येथे भुंकपाचे सोम्य धक्के घटना स्थळि खा हेमंत पाटील यांनी दिली भेट
नांदेड हिमायतनगर
विशेष प्रतिनिधी नागोराव शिंदे
रिफ26 एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास पोत्रा,सिंदगी परिसरात भूकंपाचे सोम्य धक्के बसल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.
हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. यावेळी खासदार हेमंतभाऊ यांनी जिल्हा प्रशासनास याबाबत दक्ष राहून कार्य करण्याचा सूचना दिल्या.
यावेळी त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोत्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्याठिकाणच्या सोयीसुविधा कोरोनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या उपाय योजनेची माहिती घेतली. यावेळी वसमतचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, जि.प. सदस्य राजू चापके, बालाजी देवकर ,माजी जि.प.सदस्य रवी नादरे, प.स.सदस्य संजय मंदाडे,सोमनाथ रणखांब, रमेश साळुंखे, संभाजी सिद्धेवार ,विद्याधर मगर, रामराव मगर, संतोष मगर, प्रभाकर कंधारे, प्रतापराव मगर,ज्ञानेश्वर मगर, बाळू मगर ,अशोक मगर, मारोतराव देशमुख, माधव नगर, बाळासाहेब खंदारे, विजय मुलगीर, रघुनाथ मुलगीर, शंकर मुलगीर, सरपंच सोपान रणवीर, शिवदास अप्पा, जानकीराम अप्पा ,शंकर पाटील सुधाकर भारती सह आदी उपस्थित होते.