अस्वलाच्या हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी कोरटा वन परिक्षेत्रातील घटना यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर
ब्योरो रिपोट :- फुलसावंगी
मोरचंडी येथील वृद्धावर आज सकाळ च्या सुमारास अस्वालने पायी जात असलेल्या वृद्धावर हल्ला चढवला ज्या हल्ल्या मध्ये सदर वृध्द गंभीरपणे जखमी झाले असून
फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्रथमोपचार केल्या नंतर यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे .
मोरचडी ता उमरखेड येथील नारायण डुकरे वय 55 वर्षे हे आपल्या नातवंडांना कोरटा
येथे सोडून पायी परत येत असताना कोरटा
वन परिक्षेत्रात नारायण डुकरे यांच्या वर अस्वालने जोरदार हल्ला चढवला या हल्ल्यात
डुकरे यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले
या हल्ल्यात त्यांच्या हाताचा अस्वालने चावा घेतल्याने हात ची हाड तुटली आहे . जखमी अवस्थेत नारायण यांनी जवळपास चार किमी चा अंतर पार पाडला व नंतर बेशुद्ध झाले ही घटना घरच्यांना कढताच त्यांनी वन रक्षक दीपक कुमार गुडळे यांच्या मदतीने फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा साठी दाखल केले . प्रथमोपचार नंतर नारायण डुकरे यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
प्रतिनिधी :- शेख,चांद शेख,तैयब