उखळाई मंदिरात लाख भाकरी भाजी चा हाजारो भाविकांनी घेतला लाभ
नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे
लाख भाकरी भाजी उपहार महोत्सव श्री कृष्ण मंदिर श्री देव ऊखळाई देवस्थान प.पु.वैराग्यमुर्ती दत्ता बापु यांच्या हस्ते श्री कृष्ण मंदिर हदगाव येथे संपन्न
हदगाव पंचक्रोशीतील सर्व सदभक्तांना कळविण्यात आनंद होतो कि,श्रीकृष्ण मंदिर श्रीदेव ऊखळाई देवस्थान येथे भाजी भाकरी उपहार महोत्सव आयोजित केला होता.महानुभाव संप्रदायाच्या पंचकृष्णापैकी चौथे कृष्ण म्हनजेच श्रीगोविंदप्रभु महाराज यांच्या ठाई श्रीश्रेत्र ॠध्दपुर येथे एका भक्ताने लाखांच्या भाजी भाकरीचा उपहार केला होता , तोच भाजी भाकरीचा उपहार वैराग्यमुर्ती श्री गुरुवर्य बापुंनी हदगाव नगरी मध्ये करण्याचा मानस ठेवून हा पवित्र हेतु डोळ्यासमोर ठेवून लाख भाकरी उपहार महोत्सवाचे आयोजन हदगाव नगरीत श्री कृष्ण देव मंदिर देवस्थान हदगाव ए.226 केले होते .
पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे .
सर्व क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी व शासकीय अधिकारी सर्व राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी भाजी भाकरीचा प्रसादाचा स्वाद घेतला .
भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉ.शिवश्री अंकुश पाटील देवसरकर सौ.शुभांगी अंकुशराव पाटील देवसरकर शिवश्री युधिष्ठिर पाटील देवसरकर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल चे प्रतिनिधी सौ राणी युधिष्ठिर पाटील देवसरकर देवसरी येथील सरपंच गजानन पाटील देवसरकर तालुका उमरखेड यवतमाळ जिल्हा येथुन ही भाविकांची गर्दी प्रसादाच्या स्वाद घेतांना पाहावयास मिळाली.
संध्याकाळी सात वाजता श्री कृष्ण मंदिरात श्रीदेव ऊखळाई मातेची महाआरती प.पू.वैराग्यमुर्ती दत्ता बापुंनी सर्व भाविक भक्तांनी केली .
आयोजक पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त
विनीत श्री योगीबापु हदगाव ,श्री गोविंदराज विव्दांस,श्री पार्थ शास्त्री विव्दांस