प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तर्फे निवेदन.
ढाणकी प्रतिनिधी
पत्रकारांच्या हक्क व सन्मानासाठी लढणाऱ्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तर्फे पोलीस स्टेशन बिटारगाव बु येथे निवेदन देण्यात आले.
मारेगाव येथील सिन्हझेप चे पत्रकार पंकज नेहारे व पत्रकार सचिन मेश्राम हे दोघे स्थानिक मार्डी चौकट जमलेल्या गर्दी मध्ये काय प्रकार चालू आहे हे पाहण्यासाठी तसेच मध्यस्थी करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचारी नितीन खांदवे व अब्दुल करीम यांनी सदर पत्रकारांना तुम्हाला काय करायचे, तुम्ही कोण आहे हे मला माहित नाही अश्या शब्दात अपमान केला. पत्रकारांनी त्यांचे ओळखपत्र दाखवले असता पोलिसांनी ते फेकून दिला व अरेरावीची भाषा केली. या मुळे जनतेसमोर पत्रकारांची प्रतिष्ठा कमी करून अपमानित केले आहे. जर हे वाहतूक पोलिसांची मोठ्या प्रमाणात मनमानी व अरेरावीची भाषा करत पत्रकारांना काहीच समजत नसेल तर सामान्य जनतेचे काय हाल असेल. या अश्या वाहतूक पोलीस शिपायांवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी या करिता प्रेस संपादक व पत्रकार संघटना उमरखेड तालुक्याच्या वतीने ठाणेदार विजय चव्हाण बिटारगाव पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, उमरखेड तालुका अध्यक्ष उदय पुंडे, उपाध्यक्ष मारोती गव्हाळे, सरचिटणीस मोहन कळमकर, कार्याध्यक्ष मारोतराव रावते, पत्रकार सौदागर, कमलाकर दुलेवाड, गजानन गंजेवाड आदी पत्रकार बंधू उपस्थित होते.
प्रतिनिधी :- राजु पिटलेवाड