दारव्हा तालुक्यात बारावीची कॉपी मुक्त परीक्षा लाबाच फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
दारव्हा तालुक्यात १२ वीची परीक्षा सुरू झाली असून अमरावती विभागीय परीक्षा मंडळातर्फे दारव्हा तालुक्यातील एकूण ७ परीक्षा केंद्र असून माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक चवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका परीरक्षक गटशिक्षणाधिकारी दीपिका गुल्हाने यांच्यानिरीक्षणात एकूण२३०० विद्यार्थी १२वि ची परीक्षा देत आहे मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर होता परीक्षे करीता विविध भरारी पथकाची नेमणूक केलेली असून आज पहिल्याच दिवशी विरजी भीमजी केंद्र वर गटविकास अधिकारी राजीव शिंदे यांच्या पथकाने भेट दिली सदर पथकामध्ये विस्तार अधिकारी गणेश निमकर व अधीक्षक अनिल पुरी आणि इतर सदस्यांनी केंद्राची पाहणी केली व कॉपी मुक्त परिक्षे बद्द्ल समाधान व्यक्त केले विरजी भीमजी घेरवरा कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्रावर सुरवातीस गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यां चे स्वागत करण्यात आले व तणाव मुक्त परीक्षेसाठी प्रत्येक वर्ग समोर रांगोळी टाकण्यात आली होती सादर केंद्रावर एकूण २६२ विद्यार्थी परीक्षा देत असून केंद्रप्रमुख प्राचार्य सुरेश निमकर उपकेंद्रप्रमुख अंजली बुलबुले मॅडम आहे परीक्षा कॉपी मुक्त व तणाव मुक्त व्हावी याकरिता मुख्याध्यापिका कल्पना धवणे उपप्राचार्य प्रमोद चिरडे ,पर्यवेक्षक दत्ता कसंबे प्रा दिलीप भोयर प्रा शाम गोरे ,प्रा प्रशांत कचाटे, व शाळेतील कर्मचारी मेहनत घेत आहे.
विशेष :- प्रतिनिधी दारव्हा