बोरी येथील एल. एम. एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बक्षीस वितरण संपन्
बोरीअरब वार्ता-आज दिनांक आठ फेब्रुवारी 2020 शनिवारी रोजी स्वर्गीय माणिकराव सावंकार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये बाल महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी क्रीडा स्पर्धा चित्र कला, रंगभरण स्पर्धा ,संगीत खुर्ची ,नृत्य स्पर्धा, समूह नृत्य आणि एकल नृत्य तथा नाट्य तसेच आकाशदीप स्पर्धा अशा विविधांगी स्पर्धेचा वितरण सोहळा पार पडला या बक्षीस वितरण सोहळ्याचे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन केले त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय रमेशजी चौधरी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजयभाऊ मालानी (युवा उद्योजक) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मा श्री रवी पाटील अवचट मा श्री पंकज भाऊ बांगड मा श्री शफी काका अहमद शेख श्री ज्ञानेश्वर पाटील आरू श्री मोडकर, श्री राजेश गुप्ता तथा मुख्याध्यापक आशिष सावकार आदी मान्यवर होते रँली स्पर्धेमध्ये या शाळेने प्रथम क्रमांक पटकविला यात सहभागी विद्यार्थ्यांना सन्माननीय संजीवभाऊ मालाणी यांनी विविधांगी बक्षीस दिली तसेच माननीय विठ्ठलदाजी आरु यांनीसुद्धा बक्षीस दिलीत याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशिष सावंकार यांनी केले तर संचालन निकिता टाके यांनी केले तर आभार शिक्षिका राखी मोरे यांनी मानले. यावेळी पालकांना सुद्धा गौरविण्यात आले तथा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका संजीवनी तिजारे,सारिका तिजारे. धनश्री आदींनी परिश्रम घेतले.
विशेष:- प्रतिनिधी