शाहीन बाग च्या धर्तीवर आता यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे शाहीनबाग ला सुरुवात…..
( Tv9maza न्यूज नेटवर्क )
दारव्हा -“:- नागरिकता संशोधन विधेयक हा फक्त मुसलमानांसाठी नव्हे संपूर्ण देशाच्या प्रत्येक धर्म व समाजासाठी चिंताजनक बाब आहे.हा कायदा देशाला एका त्रासदी कडे नेईल, आज याला देशात फक्त मुस्लिम देशात समुदाय विरोध करीत आहे याचे कारण म्हणजे या कायद्यापासून बाधित होणाऱ्या अन्य धर्म धर्म समाजाच्या सर्वसामान्य,गरीब,अशिक्षित,पीड़ित वर्गाला सरकारच्या खोट्या व संभ्रमित धोरणामुळे योग्य ती सत्य परिस्थिती मिळत नाहीये,ज्या दिवशी भारतीय नागरिकतेची ही विषमतापूर्ण बाब सर्वांना कळेल,सर्वाना सोबत घेवून जागरण होईल त्या दिवशी देश जागृत होऊन देशात मोठा आंदोलन उभा होईल, देशाच्या एकात्मतेला संविधानाला, शांती व सौहार्दतेला तड़ा घालणाऱ्या अशा कायद्याची काही गरज नव्हती मात्र या मोदी सरकारने आपली विविध क्षेत्रात विफलता व सुमार कामगिरी लपविण्याकरिता आपल्या धोकेबाजी व कपट पूर्ण नीतीने सर्वाना अडचणीत आणले आहे. यावेळी त काही वरिष्ठांनी नागरिकता संशोधन कायद्या व एनआरसी, एनपीआरमुळे भविष्यात येणाऱ्या अडचणीवर उपस्थितांना यथोचित मार्गदर्शन केले.
नागरिकता संशोधन विधेयक, एनआरसी, व सेन्सस वर प्रश्नोत्तरचा सेशन झाला,जेणेकरून शाहीन बाग आंदोलनात येणाऱ्या प्रर्दशनकारी महिला जागरूक व्हाव्या असा उद्देश्य होता.दरम्यान केंद्र शासन जोपर्यंत हा सीएए कायदा रदद् करीत नाही तो पर्यन्त दारव्हा शहरात आर. के. फंक्शन हॉल आठवडी बाजार दारव्हा
मोठ्या प्रमाणात हा आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पवित्रा आंदोलनकारी महिलांनी घेतला आहे, दु.1 वा. दरम्यान दारव्हा शहराच्या मुख्य ठिकाण वरून हा मोर्चा ला सुरुवात करण्यात आले होते… याठिकाणी आंदोलन शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने व्हावे याकरिता दारव्हा सामजिक न्यायसंघ च्या वतीने आयोजित करण्यात आला…
विशेष प्रतिनिधी ,दारव्हा