ताज्या घडामोडी

पळसपुर येथे पेनगंगा नदी पात्रावर अवैध रेती वाहतूक सक्रिय

( हिमायतनगर :-  न्युज नेटवर्क  )

पळसपूर माणकेश्वर पेंडवरून जेसीबीच्या साहाय्याने रात्रीला रेतीचे उत्खनन सुरू आहे.येथे तलाठी भेट देऊनही कार्यवाही न करता निघून गेले.कोणत्याही प्रकारचा लिलाव झाला नाही. विना परवानगी उत्खनन सुरू आहे .आज रात्रीला नदीत जेसीबी अडकलेल्या अवस्थेत असून दुसरी मशीन आणून जेसीबी काढण्यात येत आहे.
हा प्रकार ग्रामस्थांनी हाणून पाडला असून त्यामुळे वाहने लांबविण्याच्या नादात रेती काढण्यात गेलेली जेसीबी अडकून बसली आहे. जवळपास १०९ते १५० नागरिक या ठिकाणी जमले होते. अशी माहिती व दिवस रात्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळं पैनगंगा नदीतून रात्रीला उत्खननाचे सर्व नियम तोडून रेतीची चोरी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.यावर तहसीलदार जाधव काय भूमिका घेतात याकडं पळसपूर येथील नागरिकांच्या नजारा लागल्या आहेत. दुपारी येथील तलाठी माने यांनी उत्खनन ठिकाणी भेट दिली रेतीने भरलेली वाहन असताना कोणतीही कार्यवाही न करता खाली करून निघून जा असे सांगून काढता पाय घेतला त्यामुळे हा सर्व प्रकार तलाठी माने यांच्या संगनमत असल्याने झाल्याचं व्हिडीओ फोटो व्हायरल केलेल्या पर्यावरण प्रेमी युवक व नागरीक सांगत असून तहसीलदार साहेब फोन केला तर फोन उचलला नसल्याचे रेती चोरीचा प्रकार हाणून पडलेल्या युवकांनी म्हंटल आहे,

 

<< प्रतिनिधी :- शेख चांद शेख तैयब >>

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *