मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन फडणवीसांमुळेच युतीत तणाव वाढला; भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाची नाराजी.
TV9MAZA न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेना-भाजप युतीतल्या तणावाला फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असल्याचे समोर येत असून, यामुळे भाजपचे केंद्रीय नेतृत्व प्रचंड नाराज झाल्याचे सांगितले जात आहे. युती करताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना ज्याप्रकारचे शब्द दिले ते आता पाळताना भाजपची अडचण होत आहे. यामुळेच फडणवीस व ठाकरे यांच्यात संवाद तुटलेला असून, भाजपच्या केंद्रीय नेत्यांनाही मध्यस्थी करण्यात अडचणी असल्याचा दावा भाजपच्या नेत्यामध्ये सुरू आहे.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी राज्याच्या सत्तेत भाजपचा वाटा मोठा असलाच पाहिजे असे फडणवीस यांना बजावले असून, शिवसेनेला अतिरिक्त खाती व मुख्यमंत्रिपद देण्यास केंद्रीय भाजपचा विरोध आहे. युतीचे समीकरण जुळवण्याची सर्वस्वी जबाबदारी फडणवीस यांच्याकडेच दिली असल्याने इतर कोणताही नेता सत्ता समीकरणाचे गणित जुळवण्यात पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत फडणवीस यांच्यासोबत शिवसेनेने संवाद बंद केल्याने अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.
आता यामध्ये केवळ फडणवीस यांनीच अंतिम निर्णय घेत तोडगा काढावा, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे फडणवीस एकाकी पडल्याचे चित्र आहे.
प्रतिनिधी :- शेख.चाँद
