ताज्या घडामोडी

ढाणकी बसस्थानकावर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. 

ढाणकी बसस्थानकावर वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज ढाणकी बसस्थानक येथे वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन आणि हरित बसस्थानकाची संकल्पना राबविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षिका सौ. अर्चनाताई सुंदरकांता वासमवार* उपाध्यक्ष दत्त दिगांबार वानखेडे ,. त्यांच्या हस्ते बसस्थानक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी *सुंदरकांता वासमवार* हे देखील उपस्थित होते.

 

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड आगाराचे लेखाकार प्रफुल खंदारे आणि ढाणकी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सुदीप देवरकर उपस्थित होते.

 

परिवहन मंत्र्यांचे आदेश

या प्रसंगी बोलताना माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व बसस्थानकांवर वृक्षारोपण साजरे करावे, असे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “एसटी केवळ प्रवासी वाहतूकच करत नाही तर पर्यावरण रक्षणातही पुढाकार घेत आहे. बसस्थानक परिसर हिरवागार करणे ही काळाची गरज आहे.”

 

इतर मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला प्रवासी मंडळाचे अ *माधवराव मिटकरे*, अध्यक्ष *हिरासिंह चव्हाण*, सचिव शेख इरफान, नाथा पाटील, सदस्य *जन्नवार अण्णा*, सफाई कामगार *प्रदिप गायकवाड* तसेच प्रवासी आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

आभार प्रदर्शन

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन ढाणकी बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सुदीप देवरकर यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवर, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

 

बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी एसटी कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.  ढाणकी बसस्थानकावर नगराध्यक्षिका सौ. अर्चनाताई वासमवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करताना. सोबत आगार लेखाकार प्रफुल खंदारे व इतर मान्यवर.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *