महागांव तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त.
यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख
यवतमाळ/महागाव तालुक्यामध्ये नव्याने रुजू झालेले रोहित शिंदे परिविक्षाधीन तहसीलदार यांनी रेती माफिया वर धडक कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त करून महागाव तहसील कार्यालयात लावण्यात आले त्यामुळे तालुक्यातील रेती माफिया यांचे धाबे दणाणले आहे. सखाराम मुळे सर उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शन मध्ये एक पथक तयार करून त्या पथक मध्ये यांचे नेतृत्वाखाली, वैभव पवार निवासी नायब तहसिलदार महागाव, मंडळ अधिकारी गोविंद ठाकरे, ग्रा. म. अधिकारी निलेश आखाडकर, महसुल सेवक सुरज लोणकर, देवानंद फोफसे, दिपक वैरागडे, सदानंद जराड यांचे सहकार्याने मौजा महागाव येथुन अवैधरीत्या रेती चोरून नेणारे वाहन पकडुन पुढील दंडात्मक कार्यवाही करीता तहसील कार्यालय महागाव येथे लावण्यात आले. सदर कार्यवाही ही दि.29/9/2025 रोजी सायं 6:15 वाजता करण्यात आली.




