ताज्या घडामोडी

घरकुलाच्या पैशाची अफरातफर करणाऱ्या ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांना निलंबित करा.

घरकुलाच्या पैशाची अफरातफर करणाऱ्या ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांना निलंबित करा.

 

(शिव सेना (उबाठा) यवतमाळ जिल्हा, समन्वयक संजय पळसकर यांची मागणी)

 

उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकटे

उमरखेड तालुक्यातील सोनदाभी येथील ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांनी पी. एम. घरकुल योजनामधील घरकुलातील पैशाच्या लोभापाई मिदोंडे या लाभार्थ्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या आकाउंटमध्ये न टाकता परस्पर दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये टाकल्याचे आरोप करण्यात आला असून लाभार्थ्यांच्या घरकुलामध्ये झालेल्या पैशाची अफरातफर व भ्रष्टाचाराची चौकशी करुन ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये पं.स. येथे शिवसेनेच्या वतीने डफली बजाव आदोलन करण्यात येईल व या निवेदनाची दखल घेऊन लेखी स्वरुपामध्ये चौकशीचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड यांना दिला असून सोबत

पैशांची अफरातफर झालेले पुरावे सुद्धा देण्यात आल्याचे म्हटले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *