महागांव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डीजेला परमिशन मिळणार नाही.
मुख्य संपादक : एस. के. चांद एडिटर.
यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख.यांची रिपोट
महागाव येथे आज दिनांक १६/०१/२०२७ दुर्गा/शारदा उत्सव मंडळ पदाधिकारी डीजे मुक्त दुर्गा उत्सव यांची सभा आयोजित करण्यात आली. सभेमध्ये दुर्गा/शारदा मंडळाच्या पदाधिकारी यांना डी. जे. वे वाद्य वाजवणार नाही पारंपारिक वाद्य मध्ये मिरवणूक काढावी. या विषयी मार्गदर्शन करून सुचना देण्यात आल्या. तसेच मंडळाचे पदाधिकारी यांच्या समस्या जाणून घेतल्या महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री धनराज निळे यांनी सर्व मंडळांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून डीजे मुक्त दुर्गा उत्सव व शारदा.
उत्सव साजरा करण्याच्या सूचना दिल्या तसेच यापुढे डीजेला परमिशन मिळणार
नाही असे मनोगत व्यक्त केले शांतता कमिटीच्या मिटींगला महागाव शहरातील दुर्गा
उत्सव व शारदा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.




