ताज्या घडामोडी

ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘एक दिवस कोरडा’ मोहिम.

ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘एक दिवस कोरडा’ मोहिम.

प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे

प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुनेश्र्वर, आरोग्य सहाय्यक चव्हाण आरोग्य साहाय्यक वाघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‌आज आरोग्य केंद्राच्या कार्यर्क्षेत्रातील ढाणकी शहरात कंटेनर सर्व्हे आणि टेमिफॉस ॲक्टिविटी करण्यात आली..

पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य तसेच डेंग्यूसारखे आजार पसरण्याची शक्यता असते या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी जनजागृती करून घरोघरी जाऊन भांड्यात साचलेले घाण पाणी काढून टाकून, डासआळी आढळलेल्या कंटेनरमध्ये टेमिफॉस द्रावण टाकण्यात आले तसेच ताप रुग्णांचे रक्त नमुने घेण्यात आले…

यावेळी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हनून पाळण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले.

या अक्टिविटी साठी आरोग्यसेवक दादाराव हंबर्डे, अविनाश रावते, सतिष वणवे, गंगाधर ढगे, बालाजी जाधव, रंगराव खोकले आशासेविका नंदा कांबळे आणि संगीता झिंझडे यांनी परिश्रम घेतले.

About The Author